(फेसबुक वरील एक तृतीपंथी मैत्रिणीचे अनुभव ऐकून सुचलेली कविता)
तू समाजाचा भाग म्हणून
निर्भयपणे वावरत रहा.🤗
समोर येणाऱ्या संकटाना
दोन हात करत रहा.🤗
हा समाज असाच आहे
तू धाडसाने उभा रहा.🤗
स्वतःच्या आशा आकांक्षा
जिद्दीने पूर्ण करत रहा.🤗
कितीही दिले दूषणं तरी
स्वतःला तू सावरत रहा.🤗
हे जग दुटप्पी आहे
स्वतःला नेहमी जपत रहा.🤗
कमी लेखणाऱ्यांना दुर्लक्षून
स्वतःचे छंद जोपासत रहा.🤗
जीवन फक्त तुझे म्हणून
आनंदाने हसत रहा.🤗
लैंगिकता नैसर्गिक आहे
ताठ मानेने जगत रहा.🤗
– प्रेमा
January 16, 2022 at 6:14 am
खूपच छान… हा परिणाम नैसर्गिकच आहे हे अजून समाजात समजलेलं नाही… आता हळूहळू थोडी जागरूकता येत चालली आहे 👍👍👍
January 16, 2022 at 6:41 am
हो ना दादा.
धन्यवाद!🙏😊
January 16, 2022 at 6:20 am
Very good, a topic not written about as still 90% population is not willing to accept the reality!
January 16, 2022 at 6:41 am
You are Right Tai.
Thank you.🙏😊
January 16, 2022 at 6:30 am
Good Topic…. सामाजिक विषय आहे हा….
कोण बोलत नाही यावर
अतिशय सुंदर विश्लेषण
January 16, 2022 at 6:42 am
यावर बोलण्याचे प्रमाण अजुन कमी आहे.😊
धन्यवाद सर.🙏😊