प्रत्येकाला वाटत मी सगळ्यांना खूप हसवतो
मग
आपलं समजणाऱ्यांना रडवतं कोण?🤷‍♀️

प्रत्येकाला वाटत मी खूप समजूतदार
मग
समोरच्याला वेड्यात काढतं कोण?🤷‍♀️

प्रत्येकाला वाटत मी नाती खूप छान जपतो
मग
आप्तेष्टांना दूर करतं कोण?🤷‍♀️

प्रत्येकाला वाटतं मी सगळ्यांना खूप सुखावतो
मग
जवळचे म्हणवणाऱ्यांना दुखावतं कोण?🤷‍♀️

प्रत्येकाला वाटतं मी खूप साधाभोळा
मग
समोरच्याला शहाणपण शिकवतं कोण?🤷‍♀️

प्रत्येकाला वाटतं मी खूप न्यायी माणूस
मग
समोरच्या लोकांवर अन्याय करतं कोण?🤷‍♀️

प्रत्येकाला वाटतं मी खूप दानशूर व्यक्ती
मग
सर्वसामान्यांची लुबाडणूक करतं कोण?🤷‍♀️

प्रत्येकाला वाटतं कोरोनाकाळात मी कामापुरता घराच्या बाहेर पडतो
मग
विनाकारण गर्दी करून रस्त्यावर बोंबलत फिरतं कोण?🤷‍♀️

– प्रेमा