मिञ मैत्रिणींना भेटण्यासाठी असते तुझी धडपड,
मैत्रिच्या घोळक्यात करतेस खूपच बडबड.😅

हसून बोलतेस की बोलून हसतेस सर्वांना हा प्रश्न,
सर्वांच्या हालचालींवर असतं तुझं बारीक लक्ष.☺️

हसत हसत लोकांची खेचतेस छान,
बोलताना लहान मोठ्यांचा जपतेस मान.😀

छान छान पदार्थ बनवून खाणे तुझी आवड,
ती पूर्ण करतेस मिळेल तुला जेंव्हा सवड.😋

तुझा ड्रेसिंग सेन्स आहे खूप भारी,
तुझ्या सख्या गोळा होऊन त्याची चौकशी करी.😍

तुझ्या मधुर बोलण्यातून मिळते सुख,
कायम अशीच रहा खेळकर आणि हसमुख.🥰

अशीच सुखी आणि समाधानी रहावं हीच इच्छा,
मीनल तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🎉🎊
– प्रेमा