फक्त काही दिवसांच्या बोलण्यातून

अनोळखी मी तुला ओळखीची वाटते कशी?🤔

 

स्वतःतील चांगले वाईट गोष्टी सांगण्या इतपत

अनोळखी माझ्यावर तुझा विश्वास बसतो कसा?🤔

 

जीवनात आलेले चढउतार सांगताना

अनोळखी मला तू सगळे गुपित सांगतो कसा?🤔

 

भविष्याचे नियोजन करताना सल्ल्यासाठी

अनोळखी मी तुला विश्वासू वाटते कशी?🤔

 

दैनंदिन जीवनातील सुख दुःख मांडताना

अनोळखी माझ्या समोर मनमोकळा होतो कसा?🤔

 

आपली फारशी ओळख नसताना

अनोळखी माझ्या अबोल्याने तुझा कंठ दाटतो कसा?🤔

– प्रेमा