मध्येच रुसणारी
खुदकन हसणारी
एक तरी मैत्रीण हवी.😊
काहीतरी मध्येच बोलणारी
लगेच शांत बसणारी
एक तरी मैत्रीण हवी.🥰
अखंड बडबड करणारी
मध्येच शून्यात जाणारी
एक तरी मैत्रीण हवी.😊
माझं ऐकुन घेणारी
स्वतःच ऐकवणारी
एक तरी मैत्रीण हवी.🥰
सुख दुःख जाणून घेणारी
मानसिक आधार देणारी
एक तरी मैत्रीण हवी.😊
चेहरा पाहून मनातलं ओळखणारी
मायेने त्याची चौकशी करणारी
एक तरी मैत्रीण हवी.🥰
स्वतःचा हक्क दाखवणारी
माझ्यावर दादागिरी करणारी
एक तरी मैत्रीण हवी.😊
आपलंच म्हणून समजणारी
स्वतःचे मन मोकळे करणारी
एक तरी मैत्रीण हवी.🥰
– प्रेमा
January 17, 2022 at 5:36 am
Masta!!! Ek tari mitra pan asa hawach!!!
January 17, 2022 at 9:33 am
खरंय खरंय.👍
पुढची कविता त्याचावरच असेल ताई.🙏😂