धर्म द्वेष दाखवत आपण
नकळत मित्रांपासून दूर जात असतो,
हे लक्षात पण येत नसेल तर
आपल्या सो कॉल्ड पदवीला काहीही अर्थ नसतो.😊
बऱ्याच वेळेस एखाद्या धर्माचे नाव ऐकून
काही लोकांचे पित्त खवळते,
नकळत आपल्याच लोकांच्या मनात
तेढ ही निर्माण होते.😊
कोणताच धर्म दुसऱ्या धर्माचा
तिरस्कार करण्यास शिकवत नाही,
सर्व धर्म समभाव याचा अर्थ
बाकी धर्मच वाईट, असा नाही.😊
दुसऱ्या धर्माला नावे ठेवण्यासाठी
जन्म आपला असा नव्हे,
समाजकार्यात अशा गोष्टींना
मित्रांनो, जागा देणे ठीक नव्हे.😊
– प्रेमा
Leave a Reply