ज्याच्या बोलण्याने दुःख दूर पळून जाईल असा एक तरी बेस्टी असावा.🥰

रुसवा काढण्यासाठी फालतू विनोद करून खळखळून हसवेल असा एक तरी बेस्टी असावा.🥰

ज्याच्या सहवासात मन प्रसन्न होईल असा एक तरी बेस्टी असावा.🥰

बिनधास्त सगळीकडे फिरत नवनवीन ठिकाणची माहिती देईल असा एक तरी बेस्टी असावा.🥰

ज्याच्या मधुर बोलण्यातून दुखांवर फुंकर घातली जाईल असा एक तरी बेस्टी असावा.🥰

कंटाळा आला तर अचानक मस्त ट्रीट देऊन खुश करेन असा एक तरी बेस्टी असावा.🥰

ज्याच्या समोर निर्धास्तपणे मन मोकळं करता येईल असा एक तरी बेस्टी असावा.🥰

जीवाला जीव देऊन मनापासुन खरी मैत्री निभवेल असा एक तरी बेस्टी असावा.🥰

जो प्रश्न न करता खरंच मनापासुन समजून घेईन असा एक तरी बेस्टी असावा.🥰
– प्रेमा