खूप खूप राग येऊनही तुझ्या

हसण्यावर भुलणारी मी तुझी प्रेमिका.🥰

 

तुझ्या मधुर बोलण्याने हुरळून

जाणारी मी तुझी प्रेमिका.🥰

 

तुझ्या प्रेमळ स्पर्शाने बेभान

होणारी मी तुझी प्रेमिका.🥰

 

तुझ्या मजेदार विनोदावर खळखळून

हसणारी मी तुझी प्रेमिका.🥰

 

तुझ्या विचारात नकळत दंग

होऊन जाणारी मी तुझी प्रेमिका.🥰

 

तुझ्या प्रेमाच्या रंगात रंगून स्वतःला

विसरणारी मी तुझी प्रेमिका.🥰

– प्रेमा