प्रिय वाचक वर्ग,
खूप दिवसांपासून तुमच्याशी संवाद साधण्याचा विचार सुरू आहे. आज मी तुम्हा सर्वांचे आभार मानणार आहे.😊 लहानपणापासून वाटायचे की आपण लिहू शकतो पण तो विचार प्रत्यक्षात उतरण्याची वेळ कोरोनाकाळात आली.☺️ या काळात खूप लोकांचे दुःख, व्यथा, भावनांचे खेळ जवळून अनुभवता येत होते आणि ते मी शब्दात उतरवण्यास सुरुवात केली.😊 व्हॉट्स ऍप आणि फेसबूक ग्रुप वर ते लिखाण पोस्ट करत होते; त्यातून तुमचा प्रतिसाद मिळत गेला आणि मी अजुन लिहीत गेले.😊 समाजातील घडणाऱ्या घडामोडी, लोकांच्या भावना, जीवनातील काही बदल, लोकांचे स्वभाव याकडे डोळसपणे पाहण्याची एक नजर यातून येत आहे.😊 त्यातून माझ्या साथीदाराला website तयार करण्याची युक्ती सुचली आणि https://premachyakavita.com चा जन्म झाला.
प्रेमाच्या म्हणजे माझ्या कविता वाचून “माझ्या विषयी किंवा माझ्यासाठी लिहिले आहे, हा अनुभव आम्हाला येतो, खरी मांडणी केली आहे” अशा कमेंट मधून आपण योग्य ट्रॅक वर असल्याचे समजते.☺️ तुम्ही माझ्या कविता वाचून त्यावर ज्या प्रतिक्रिया देता त्याने लिखाणाचा अजुन हुरूप येतो.🥰 फक्त भारतातच नाही तर बाहेरील देशात पण लोकं आपल्या कविता वाचतात यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही.😍 काही चुकत असेल किंवा काही बदल अपेक्षित असेल तर जरूर सुचवू शकता.😀 तुमच्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळते त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! 🙏 यापुढे ही प्रेमाच्या कवितांना असेच प्रेम द्याल ही अपेक्षा.
तुमचीच प्रेमा.🙏😊