चारचौघात गटाचे कौतुक करून एकांतात चुकांवर बोलणारा तोच खरा गट नेता.☺️

चूक झाली म्हणून गटाला दोष न देता त्याची स्वतः जबाबदारी स्वीकारणारा तोच खरा गट नेता.☺️

समस्या सोडवण्यासाठी गटाला जबाबदार न धरता सदस्यांचे धैर्य वाढवणारा तोच खरा गट नेता.☺️

आपल्या चुकीचे खापर गटावर न फोडता सदस्यांना प्रोत्साहित करणारा तोच खरा गट नेता.☺️

कठीण प्रसंगी गटाला वाऱ्यावर न सोडता सदस्यांच्या बाजूने उभा राहणारा तोच खरा गट नेता.☺️

नेहमी नकारात्मक गोष्टींवर न बोलता सकारात्मक गोष्टीतून गटात नवचैतन्य निर्माण करणारा तोच खरा गट नेता.☺️

कान भरणाऱ्या सदस्यांना दूर ठेवून काम करणाऱ्या सदस्यांवर विश्वास ठेवणारा तोच खरा गट नेता.☺️

सोयीप्रमाणे न वागता बोलेल तो शब्द आणि मांडेल त्या मतावर ठाम राहणारा तोच खरा गट नेता.☺️

आपण ठराविक लोकांचा नाही तर पूर्ण गटाचा नेता आहे याचे भान ठेवून वर्तन करणारा तोच खरा गट नेता.☺️

सर्वांना समानतेने वागवून काही व्यक्तींना नाही तर सदस्यांच्या कामाला महत्त्व देणारा तोच खरा गट नेता.😊

स्वतःचा घमंड आणि स्वार्थ बाजूला ठेवून कायम गट हितासाठी झटणारा तोच खरा गट नेता.☺️

– प्रेमा