तू सांग ना!
तुझविन स्वतःला कसे सावरणार;
तुझ्या आठवणींना किती आवरणार?😔
तू सांग ना!
तुझ्या विषयीचे विचार कसे थोपवणार;
डोळ्यात येणाऱ्या आसवांना किती लपवणार?😔
तू सांग ना!
तुझ्या सोबत घालवलेले क्षण कसे विसरणार; मनातील वेदनेवर फुंकर किती पसरणार?😔
तू सांग ना!
तुझ्या विना मी एकटी कसे जगणार;
आयुष्यात येणाऱ्या वादळाला किती थांबवणार?😔
तू सांग ना!
तुझ्या वचनावर आता कसा विश्वास ठेवणार;
कधीतरी तू येशील या खोट्या आशेवर किती दिवस जगणार?😔
तू सांग ना!
माझ्या समोर तू दुसऱ्याचा होताना कसे पाहणार;
माझ्या डोळ्यातले अश्रू असेच अजुन किती वाहणार?😔
तू सांग ना!
तुझा हा कायमस्वरूपी दुरावा कसा सहन होणार;
प्रेमाच्या या खेळात माझा अजुन किती जीव जाणार?😔
– प्रेमा
January 24, 2022 at 3:33 am
Very nice..👌
January 24, 2022 at 3:34 am
Thank you so much.🙏😊
January 24, 2022 at 4:13 am
वाहहहहह खबपच छान….
विद्ध प्रेमिकेची आर्त वेदना चांगलीच मांडलीयस 👍👍👍
January 24, 2022 at 4:59 am
धन्यवाद दादा.🙏😊
January 24, 2022 at 5:39 am
The sadness of this live comes across beautifully 🤩
January 24, 2022 at 6:36 am
Thank you.🙏☺️
January 24, 2022 at 6:06 am
तुझ्याविना….जगणं. खूप सुंदर शब्दात मांडलय. प्रेमा
January 24, 2022 at 7:32 am
धन्यवाद ताई.🙏😊