मागे एक आणि पुढे एक बोलणं,

हे तुम्हा पळपुट्या लोकांचं काम हाय.😅

 

पळून पळून तुम्ही अजुन कुठवर पळणार?

सत्य वागेल त्याचा मागे शेवटी राम हाय.☺️

 

एवढं पण अती करू नका

पापाचा घडा भरणं सुरू हाय.😅

 

स्वकर्मावर स्वतःला सिद्ध करू एवढं

आमच्या मनगटात अजुन बळ हाय.☺️

 

सरळ साध्या लोकांना त्रास देण्याची शिक्षा

तुम्हाला इथेच पूर्ण करून जायची हाय.😅

 

खोटी प्रशंसा ऐकणाऱ्या लोकांना आमचं हे खरं

बोलणं पटणार नाही हे आम्हाला माहिती हाय.☺️

 

हेवेदावे सोडून आणि कामाकडे लक्ष केंद्रित करून,

खरं ते ऐकून खऱ्याने वागाल तर तुमचंच भलं हाय.😅

 

जास्त पाल्हाळ न लावता सडेतोड उत्तर देऊन,

बाजूला होणं हे आम्हा लोकांचं सरळ काम हाय.☺️

 

प्रेमाचा सल्ला पटला तर घ्या नाहीतर सोडून द्या,

थोडाच आमचा मान काय त्यात जाणार हाय?😂

– प्रेमा