तुझ्या दिसण्यावर नाही तर
तुझ्या असण्यावर मी प्रेम करतो.😍

तुझ्या चेहऱ्यावर वर नाही तर
तुझ्या हसण्यावर मी प्रेम करतो.😍

तुझ्या सुखातील गोष्टींवर नाही तर
तुझ्या रुसण्यावर मी प्रेम करतो.😍

तुझ्या ह्या सौंदर्यावर नाही तर
तुझ्या निरागसतेवर मी प्रेम करतो.😍

तुझ्या माझ्यावरील प्रेमावर नाही तर
तुझ्या लटक्या रागावर मी प्रेम करतो.😍

तुझ्या शांत असण्यावर नाही तर
तुझ्या बडबडीवर मी प्रेम करतो.😍

तुझ्या या शरीरावर नाही तर
तुझ्या आत्म्यावर मी प्रेम करतो.😍

हो मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो
हो मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो.😍
– प्रेमा