मागच्या वर्षी आजच्या दिवशी
एक गोड परी जन्माला आली,
चलवादी फॅमिली आनंदून गेली.🥳

देव अनिताच्या मनीचे भाव
निर्मात्याने मनोभावे ऐकले,
तिच्या येण्याने घराचे नंदनवन झाले.☺️

बाबाचा गोरा रंग आणि आईचा
करारी आवाज तिच्यात दिसतो,
दोघांचा गुण तिच्यात वसतो.🥰

बाबाची अतिशय लाडकी बबडी तर
आईची गोंडस सई सगळीकडे बागडते,
तिच्या बाललीलेने ती सर्वांना आवडते.🤗

गणू काका आणि प्रेमा माऊची
तू आहेस खूप लाडकी परी,
तुझ्या भेटीसाठी कधीही येतो घरी.😘

त्या वेड्या उमेश काकाच्या उगाच तुला
छळण्याला तू अजिबात नकोस भिऊ,
आपण दोघी मिळून त्याला एक ठोसा देऊ.🙄

तू मोठी होशील तश्या तुझ्या
बाललीला मनभरून पाहूदे,
तुझे आयुष्य आनंदाने फुलून जाऊदे.😍

पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा
प्रिय कादंबरी प्रेमा माऊकडून तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳🤗💐
– प्रेमा