माझ्या आयुष्यात तुला खूप महत्त्व आहे.
त्याचे कारण तुझ्या वागण्यातील तत्व आहे..😘
माझ्या प्रत्येक श्वासात तुझी आठवण आहे.
तू दिलेल्या आनंदी क्षणाची साठवण आहे..😘
माझ्या जीवनात तुझ्या प्रेमाचे वर्चस्व आहे.
तुझी सोबत ही माझ्यासाठी सर्वस्व आहे..😘
माझ्या मनाच्या कुपीत तुझे प्रतिबिंब आहे.
तुझ्या या प्रेमात न्हावून मी चिंब चिंब आहे..😘
माझ्या स्वप्नात फक्त तुझाच भास आहे.
प्रेमाने घेतलेला तुझाच तर हा ध्यास आहे..😘
– प्रेमा
February 24, 2022 at 4:49 am
Sweet
February 24, 2022 at 6:00 am
Thank you.🙏😊
February 24, 2022 at 4:56 am
खूपच सुंदर शब्दरचना 👍👍👍
February 24, 2022 at 6:00 am
धन्यवाद दादा!🙏😊
February 24, 2022 at 6:12 am
Such a nice way to put your thoughts across
February 24, 2022 at 6:43 am
Thank you so much Tai.🙏😊