एखाद्या संध्याकाळी स्वतःच

स्वतःला आरश्यात न्याहाळावं,

आपली दुसऱ्याशी तुलना न करता

आपणच आपल्याच रुपावर भाळावं.😊

 

एखाद्या संध्याकाळी स्वतःच

स्वतःला एकांतात निरखून पहावं

आपल्यातील होणाऱ्या बदलांना

सहज स्वीकारून आनंदी रहावं.😊

 

एखाद्या संध्याकाळी स्वतःच

स्वतःशी मस्त हितगुज करावं,

आयुष्याच्या धावपळीत आवडता छंद

सुटत नाही ना हे स्वतःलाच विचारावं.😊

 

एखाद्या संध्याकाळी स्वतःच

स्वतःशी थोडं संवाद साधावं,

राहिलेल्या इच्छा स्वतःच पूर्ण

करण्याची खूणगाठ मनाशी बांधावं.😊

 

एखाद्या संध्याकाळी स्वतःच

स्वतःचा एखादा छंद जोपासावं,

आत्ताही आपल्याला छान जमतं

या आनंदात उशीआड लपावं.😊

 

एखाद्या संध्याकाळी स्वतःच

स्वतःच छान कौतुक करावं,

जीवनाच्या उताराकडे झुकाणाऱ्या

वयाला विनाअट अलगद स्वीकारावं.😊

– प्रेमा