प्रिय नवरोबा
तू माझ्या आयुष्यात आला आणि
माझं पूर्ण आयुष्यचं बदलून गेलं
तुझ्या येण्याने माझं जीवन सुखकारक झालं.🤗
प्रिय नवरोबा
निस्वार्थी प्रेम मिळावं म्हणून वाट
पाहणाऱ्या प्रेमाला तुझं प्रेम मिळालं
तुझ्या स्पर्शाने मला खरं प्रेम कळालं.😍
प्रिय नवरोबा
आपली मैत्री आठ वर्षापूर्वीची आणि
लग्नाचं नातं पाच वर्षा पूर्वीचं
तू मात्र माझ्यासाठी फक्त पूर्वीचाच.☺️
प्रिय नवरोबा
फ्रेंड, बॉयफ्रेंड, जोडीदार या तुझ्या
नात्यात कोणताच बदल नाही झाला.
कोणताच निर्णय माझ्यावर नाही लादला.🥰
प्रिय नवरोबा
तुझं माझ्यावरचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत
बोलण्या पेक्षा जास्त कृतीतून जाणवते
तुझी ही हटके अदा तर मला वेड लावते.😔
प्रिय नवरोबा
तुझा हात माझ्या हातात काही
क्षणापूर्ता नाही तर जन्मभरासाठी हवा.
वाटे मज अंतिम श्वास तुझ्याच मिठीत घ्यावा.😘
– प्रेमा
February 26, 2022 at 6:35 pm
❤️💕 👌🌷🌷🌷🌷🌷 अप्रतिम ❤️
February 27, 2022 at 12:35 pm
धन्यवाद!🙏😊
February 26, 2022 at 7:01 pm
I know when I say it my dear child you are blessed. It’s rare but not unachievable!!!! You are with us if you want to dream your thoughts.
February 27, 2022 at 12:36 pm
Thank you Tai.🙏😊
February 26, 2022 at 11:30 pm
Very nice cute jodi 1
खुप छान प्रेमाची Love story लवकर प्रकाशन होवो हीच सदिच्छा 💐💐🍫🍫🎂
February 27, 2022 at 12:37 pm
धन्यवाद.🙏😊
February 27, 2022 at 8:04 am
Perfect 👌
February 27, 2022 at 12:37 pm
Thank you.🙏😊