होळी म्हटलं की रंगांची साठवण,
नकळत जागे होई लहानपणीची आठवण.😊
धांदल होई मिञ जुळवाजुळवीची,
मजा असायची रंग अदलाबदलीची.😜
ध्येय एकच मनसोक्त रंग खेळून आनंद लुटणे,
मोठे लोकं रागावले की हळूच पळत सुटणे.🙄
दिवस उजाडल्या पासून खेळात असू एवढे रममान,
की रात्र कधी होई याचे राहत नसे आम्हास भान.😚
खेळा विषयी कोणी कितीही करो कावकाव,
आम्ही मारायचो पुरणपोळी वर चांगलाच ताव.😋
काळानुसार हा पण खेळ बदलला,
पारंपारिक वाद्यच्या जागी डिजे आला.🙂
तरुणाई गाण्याच्या तालावर होई बेधुंद,
असा साजरा होई आता आधुनिक आनंद.😊
लहान थोरांना मिळतो सारखाच मान,
इथे होते फक्त आणि फक्त रंगांचे गुणगान.☺️
होळीच्या निमित्ताने घेऊन भांग,
या खेळात सर्वच असतात दंग.😃
परंपरा आहे होळीच्या खेळात दंगणे,
रंग खेळता खेळता प्रेमाच्या रंगात रंगणे.😍
होळी म्हटली की रंगांची सजावट,
पण या वर्षी आहे कोरोनाचे सावट.😔
सजग नागरिक म्हणून एक नियम पाळूया,
यावर्षीची होळी आपापल्या घरातच खेळूया.😊 – प्रेमा
March 28, 2021 at 3:25 am
Very nice 👌👌
March 29, 2021 at 4:24 am
Thank you so much.🙏😊
March 17, 2022 at 2:38 am
💕💕💕 Superb
March 17, 2022 at 2:44 am
Thank you.🙏😊
March 17, 2022 at 3:59 am
Very nice…
March 17, 2022 at 11:14 am
Thank you.🙏😊
March 17, 2022 at 4:37 am
Kitit chan,❤️❤️❤️❤️❤️❤️
March 17, 2022 at 11:14 am
Thank you.🙏😊
March 17, 2022 at 4:49 am
Kyaaaa baat hai, kyaa baat hai….. very beautiful 👍👍👍👍👍👍👍
March 17, 2022 at 11:16 am
Thank you.🙏😊
March 17, 2022 at 5:09 am
छान. त्रीसुत्रीचे भान ठेवुनी होळी खेळू या. नक्कीच
March 17, 2022 at 11:16 am
धन्यवाद!🙏😊