मी एखाद्या संकटात असताना
माझ्या डोक्यावरून हात फिरवत,
शांतपणे समजून सांगणारा तू
मला वडीला सारखा भासतोस.😚
मी खूप दुखी असताना
मला प्रेमाने जवळ घेऊन,
मायेने पाठीवरून हात फिरवणारा तू
मला आई सारखा भासतोस.🥰
मी अडचणीत असताना
मला भक्कमपणे धीर देऊन,
माझ्या पाठीशी उभा राहणारा तू
मला भावा सारखा भासतोस.☺️
मी अल्लडपणे वागताना
घर डोक्यावर न घेता,
मला समजून घेणारा तू
बहिणी सारखा भासतोस.🤩
मी तुझ्याशी हसी मजाक करताना
माझ्या बोलण्यावर नाराज न होता,
खेळीमेळीचे वातावरण तयार करणारा तू
मला मित्रा सारखा भासतोस🤗
तुला कदाचित माहिती नसावे
मी स्वतःला खूप लकी समजते; कारण
सख्या तुझी ही ना ना रूपे मला परत परत
तुझ्या प्रेमात पडण्यास भाग पाडतात.😍
– प्रेमा
March 7, 2022 at 3:22 am
This is the absolute truth!! Apan priyakar/preyasi chy natya madhye kiti tari veg vegle rishte jagto. Only then te paripurn prem hota.
March 7, 2022 at 4:01 am
Yes Tai.
Thank you.🙏😊
March 7, 2022 at 2:28 pm
Perfect
March 7, 2022 at 3:05 pm
Thank you.🙏😊