मी तुला गमावता गमावता मिळवलय,
तुला डोळेभरून एकदा थोडं पाहू तर दे.🤗
तुझ्यासाठी मी रात्र रात्र जागून काढलीय,
तुझी एकदा गळाभेट घेऊ तर दे.🤗
तुला मिळवण्यासाठी मी जगाचा विचार सोडलाय,
तुला एकदाचे माझ्या घट्ट मिठीत घेऊ तर दे.🤗
तुझे स्वप्न पाहून मी तुलाच माझं सर्वस्व मानलय
तुझ्या दोन्ही बाहूत मला एकदा कैद होऊ तर दे.🤗
तुला पाहताच क्षणीच मला पहिलं प्रेम झालंय,
तुझ्यावर माझ्या प्रेमाचा थोडा वर्षाव करू तर दे.🤗
तुला मनोमन माझा जोडीदार म्हणून पाहिलंय,
एकदा तुझा हात हातात कायमसाठी घेऊ तरी दे.🤗
– प्रेमा
March 12, 2022 at 3:14 am
Soo sweet..👌
March 12, 2022 at 4:11 am
Thank you so much.🙏☺️
March 12, 2022 at 3:15 am
Very romantic and cute.
March 12, 2022 at 4:11 am
Thank you so much Tai.🙏☺️
March 12, 2022 at 4:12 am
Khoopach chhaann 👍👍👍
March 12, 2022 at 4:19 am
धन्यवाद दादा.🙏☺️