तुझ्या मनीच्या भावना
वेळीच तू माझ्या समोर व्यक्त
केल्या असत्या; तर मी आत्ता
कदाचित तुझ्या सोबत असते.😊

तुझं माझ्यावरचं प्रेम इतरांना
सांगण्या पेक्षा तू माझ्या समोर
व्यक्त केलं असतं; तर मी आत्ता
कदाचित तुझ्या सोबत असते.😊

तुला माझ्या विषयी वाटणारी
प्रेमाची ओढ तू मला जाणवून
दिली असती; तर मी आत्ता
कदाचित तुझ्या सोबत असते.😊

तुला सतावणारी माझ्या
संदर्भातील काळजी तू मला
दाखवून दिली असती; तर मी आत्ता
कदाचित तुझ्या सोबत असते.😊

तुला वाटणारा माझ्या मदतीचा
स्वाभिमान तू मला लक्षात आणून
दिला असता; तर मी आत्ता
कदाचित तुझ्या सोबत असते.😊
– प्रेम