सकाळी उठल्या पासून सूर्य अस्ताला जाई पर्यंत घरोघरी
फिरून नागरिकांना जागृत करते मी आशा वर्कर.✊
पालवे, गाव, झोपडपट्टी असो की चाळ प्रत्येक घरात
शासकीय योजना पोहोचवण्याचे काम करते मी आशा वर्कर.✊
बाळाच्या जन्मा पासून ते मृत्यू पर्यंत सर्व नोंदी ठेवून
शासनाला योग्य ती मदत करते मी आशा वर्कर.✊
नवीन नवरी असुदे की वयस्कर सासूबाई त्या सगळ्यांची
चौकशी करून मैत्रीण होते मी अशा वर्कर.✊
राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या सगळ्यांना
दोन हात करून ताठ मानेने उभी राहते मी आशा वर्कर.✊
– प्रेमा
March 13, 2022 at 7:09 am
खूपच सुंदर… समाजातल्या अशा दुर्लक्षित घटकांना अशी ओळख मिळू दे 👍👍👍 त्याचं कार्य समाजासमोर येउ दे
March 13, 2022 at 9:32 am
धन्यवाद दादा.🙏😊
March 13, 2022 at 4:37 pm
💕💕🎉🙏🙏
March 14, 2022 at 1:55 am
धन्यवाद! 🙏😊
March 13, 2022 at 4:39 pm
पण ह्याच आशा वर्कर चा साधा पगार पण दिला जात नव्हता कोरोना काळात…. त्यांची वाईट अवस्था केली होती सरकारने
March 14, 2022 at 1:56 am
हो ना. तरी त्यांनी स्वतःचे काम अगदी चोखपणे पार पाडले.😊
March 14, 2022 at 8:48 am
Salute to these workers ani nava pramane te sagli kade asha/hope gheun jata. You have expressed it beautifully.
March 14, 2022 at 9:08 am
Thank you Tai.🙏😊