तू फक्त माझीच आहेस म्हणुन मी सगळ्या जगाला

ओरडून सांगितले; पण तू माझी झाली नाहीस.🙄

 

तुझा हात दुसऱ्याच्या हातात पाहून माझे मन तीळ

तीळ तुटले; पण तू माझा विचार केला नाहीस.🙄

 

तुला माझी जीवन संजीवनी बनवण्याचे मी स्वप्न

पाहिलं; पण तू मला स्वीकारलं नाहीस.🙄

 

तुझ्या सोबत सुखी संसार करण्यासाठी मी आतुर

झालो; पण तू मला त्या नजरेने पाहिलं नाहीस.🙄

 

तुझ्या भेटीसाठी मी तळमळीने धावत आलो; पण

माझ्या प्रेमाचा तू कधीच कानोसा घेतला नाहीस.🙄

 

आज तुला सांगतो की, तुझ्यासाठी सर्वस्व पणाला

लावणाऱ्या मला तू कधीही विसरू शकणार नाहीस.🙄

– प्रेमा