दिवस रात्र एक करून

तू करत असलेल्या अविरत

कष्टाने तुझे घर आणि संसार

तुझ्यासाठी ठरतात भक्ती.😊

 

संसाराचा गाडा हाकताना

कधीही विसरू नकोस की, तुला

योग्य आहार आणि व्यायामाने

आजारांपासून मिळते मुक्ती.😊

 

दैनंदिन जीवनात योग्य

पोषक आहार, सूर्यनमस्कार

आणि योगासन केल्याने मन

आणि शरीरास मिळते शक्ती.😊

 

किचन मधील सर्व पदार्थ

आयुर्वेदाचे काम करतात;

म्हणून सगळ्यांना वापर

करण्याची कर थोडी सक्ती.😊

 

वेळी अवेळी झोपून आणि जीभेचे

चोचले पुरवण्याने वय होण्या

आधीच आजार ओढवून घेत

निघेल शरीराची सगळी मस्ती.😊

 

सखी तुझ्या काळजीपूर्वक

वागण्याने घरातील सर्व सदस्यांना

मिळते अनमोल सुदृढ आणि निरोगी

आरोग्यभान जपण्याची युक्ती.😊

– प्रेमा