समोर गोड बोलून
मागे निंदा करी,
पद आणि पैशासाठी
किती ही लाचारी.
तुमच्या या वृत्तीला
ओळखते दुनिया सारी,
तरीही पैसा मिळवण्यासाठी
तुमच्या मागे मागे फिरी.
तोंडावर तुम्हा म्हणेन
तुम्ही लई भारी,
पण तुमच्या माघारी
तुमचीच लायकी काढे ही सारी.
दोघांत भांडणे लावण्याची
तुमची किमया ही सारी,
हे तुम्हाला स्वतःला उमजेल
जेंव्हा स्व-जीवनात होईल तुमची बेजारी.
माझे माझे म्हणून तुम्ही
डोक्यावर घेऊन कितीही मिरवले जरी,
एक दिवस हिच वृत्ती
तुम्हा पडेल भारी.
– प्रेमा
November 28, 2021 at 9:31 am
👏👏👏👌👌👍👍
November 29, 2021 at 4:49 am
🙏😊