अधिकाराचा योग्य वापर करून समाजहिताचे निर्णय घेऊन त्यावर ठाम राहणारा माणूस म्हणजे वाघा सारखाच निर्भिड प्राणी.😊

सगळीकडे तोंड घालून नासधूस करत नात्यांची वाट लावणारा माणूस म्हणजे डुकरा सारखाच घाण करणारा प्राणी.😊

मालकाच्या मिठाला जागून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणारा माणूस म्हणजे कुत्र्या सारखाच प्रामाणिक प्राणी.😊

जीवाला जीव देऊन पण स्वार्थ साधण्यासाठी गद्दारपणा करणारा माणूस म्हणजे कोल्ह्या सारखाच धूर्त प्राणी.😊

स्वतःची चूक नसताना भीती पोटी सगळं सहन करणारा माणूस म्हणजे मांजरा सारखाच भित्रा प्राणी.😊

प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून ध्येय गाठणारा माणूस म्हणजे हत्ती सारखाच बुद्धिमान प्राणी.😊

तुमच्या हा मध्ये हा मिळवणारा पण वेळ आली की तोंडावर पाडणारा माणूस म्हणजे लांडग्या सारखाच लबाड प्राणी.😊

रस्त्यात येणाऱ्या अडचणींना दोन हात करत ठरवले ठिकाण गाठणारा माणूस म्हणजे घोड्या सारखाच चपळ प्राणी.😊

मेंदू विकसित झाला म्हणून चूक बरोबर ओळखून पण हव्यास पोटी दुर्लक्ष करणारा माणूस म्हणजे स्वार्थी प्राणी.😊

निसर्गातून भरभरून मिळवून पण निसर्गाची वाट लावणारा माणूस म्हणजे हपापलेला निर्दयी प्राणी.😊

– प्रेमा