वाऱ्याची झुळूक येते आणि
तुझी आठवण करून देते.😊

रेडिओवर एकांताचे गाणे लागते
आणि तुझी आठवण करून देते.😊

मित्रांच्या मैफिलीत चर्चा होते
आणि तुझी आठवण करून देते.😊

जेवताना अचानक उचकी येते
आणि तुझी आठवण करून देते.😊

कातरवेळी पक्षांची चिवचिव ऐकू येते
आणि तुझी आठवण करून देते.😊

प्रेमाची लडिवाळ भाषा कानी पडते
आणि तुझी आठवण करून देते.😊
– प्रेमा