तुला स्वतःचा एक प्रगतीचा मार्ग ठरवायचा आहे,
मग आताच विचाराने असं थकून कसं चालेल?😊
तुला प्रगतीचे अनेक शिखरं पादाक्रांत करायचे आहेत,
मग आताच हार मानून कसं चालेल?😊
तुला तुझ्यातील क्षमता जगाला दाखवून द्यायची आहे,
मग आताच निराश होऊन कसं चालेल?😊
तुला येणाऱ्या अडचणींना जिद्दीने सामोरे जायचे आहे,
मग आताच माघार घेऊन कसं चालेल?😊
तुला स्वतःवर विश्वास ठेवून उंच भरारी घ्यायची आहे,
मग आताच पळवाट शोधून कसं चालेल?😊
तुला स्वतःचे उज्वल भविष्य घडवायचे आहे,
मग आताचं जगणं सहजतेने घेऊन कसं चालेल?😊
– प्रेमा
April 5, 2022 at 3:51 am
Very nice! Never give up!
April 5, 2022 at 4:25 am
Thank you Tai.🙏😊
April 5, 2022 at 3:55 am
💕 Superb writing
April 5, 2022 at 4:25 am
Thank you.🙏😊
April 5, 2022 at 4:42 am
खूपच छान…. अगदी खरय… प्रत्येकाला लागू पडतं हे👍👍👍
April 5, 2022 at 6:04 am
धन्यवाद दादा.🙏😊
April 5, 2022 at 6:35 am
Very much motivating poem…. You are becoming a good poet ….
Congratulations…..!
April 5, 2022 at 6:42 am
Thank you so much.🙏😊