लिहिणं गरजेचं असतं
कान बंद करणाऱ्या लोकांनी
काळजीपूर्वक वाचावे म्हणून.✍️
लिहिणं गरजेचं असतं
झोपेचे सोंग घेणाऱ्यांचे
डोळे खाडकन उघडावे म्हणून.✍️
लिहिणं गरजेचं असतं
दुर्लक्ष करणाऱ्याच्या
डोक्यात काहीतरी घुसावे म्हणून.✍️
लिहिणं गरजेचं असतं
गोंधळ माजवणाऱ्यांनी
कायद्याची जाण ठेवावे म्हणून.✍️
लिहिणं गरजेचं असतं
स्वार्थाने बरबटलेल्यांनी
थोडे सत्कार्य करावे म्हणून.✍️
लिहिणं गरजेचं असतं
उन्माद माजवणाऱ्यांनी
स्वतःला आवरावे म्हणून.✍️
लिहिणं गरजेचं असतं
रस्ता चुकलेल्या कार्यकर्त्यांचे
डोके ठिकाण्यावर यावे म्हणून.✍️
लिहिणं गरजेचं असतं
माणसाने माणुसकी
ध्यानी धरावे म्हणून.✍️
– प्रेमा
April 27, 2022 at 7:07 am
हम्म बरोबर
April 27, 2022 at 7:09 am
धन्यवाद.🙏😊
April 27, 2022 at 2:30 pm
True pan jasa lihina garjecha asta tasach te vachana pan garjecha asta.
April 28, 2022 at 4:16 am
Yes.
Thank you.🙏😊