‘संगत’ हा फक्त तीन अक्षरी शब्द

पण जीवनात त्याचे महत्त्व

अमूल्य आणि अफाट आहे.☺️

 

‘संगत’ चांगली असेल तर तुम्ही

रंकाचा राजा होता; पण ती वाईट असेल

तर राजाचा रंक होणे रास्त आहे.☺️

 

‘संगत’ प्रामाणिक लोकांची असेल तर तुमचे

जीवन प्रगतशील होते; पण ती खोट्यांची असेल

तर अधोगती होणे रास्त आहे.☺️

 

‘संगत’ वैचारिक लोकांची असेल तर तुमचे

भविष्य उज्वल होते; पण ती कुरघोड्या करणाऱ्यांची असेल

तर उधवस्त होणे रास्त आहे.☺️

 

‘संगत’ निस्वार्थी मित्रांची असेल तर तुमचे

जीवन सुखी होते; पण ती स्वार्थाने बरबटल्यांची

असेल तर अडचणीत येणे रास्त आहे.☺️

 

‘संगत’ हा शब्द सहज न घेता जीवनात यशस्वी

होण्यासाठी प्रामाणिक, निस्वार्थी, वैचारिक

लोकांची संगत करणे आवश्यक आहे.☺️

– प्रेमा