तोंडावर बोलुन मोकळे होणाऱ्या पेक्षा,

गोड बोलून काटा काढणारे जास्त घातक असतात.🧐

 

तुमच्या समोर गुणदोष दाखवणाऱ्या पेक्षा,

हांजी हांजी करणारे जास्त घातक असतात.🧐

 

जे काही असेल ते समोर स्पष्टपणे बोलणाऱ्या पेक्षा,

गरीब गाय पोटात पाय स्वभावाचे जास्त घातक असतात.🧐

 

तुमच्यातील सुधारणा स्पष्टपणे सांगणाऱ्या पेक्षा,

तोंड चोपडेपणा करणारे जास्त घातक असतात.🧐

 

तुमच्या समोर मनातील भाव व्यक्त करणाऱ्या पेक्षा,

पोटात एक आणि ओठात एक असणारे घातक असतात.🧐

 

माणूसकी म्हणून तुम्हाला चूक दाखवणाऱ्या पेक्षा,

मागे निंदा नालस्ती करणारे जास्त घातक असतात.🧐

 

एक घाव दोन तुकडे करण्याचा निर्णय घेणाऱ्या पेक्षा,

मनात कपट ठेवून वागणारे जास्त घातक असतात.🧐

 

चुकीच्या वर्तनावर राग व्यक्त करणाऱ्या पेक्षा,

समोर गोड राहून मागे कुरघोडी करणारे जास्त घातक असतात.🧐

– प्रेमा