निराशेचे काळेकुट्ट ढग

सभोवताली दाटते,

आयुष्यात काहीतरी

विसरल्या सारखे वाटते.😔

 

आपले म्हणणारे माणूस

आपल्याच गुर्मीत ताठते,

आयुष्यात काहीतरी

विसरल्या सारखे वाटते.😔

 

दुसऱ्याच्या चुकीचे खापर

आपल्या माथी फुटते,

आयुष्यात काहीतरी

विसरल्या सारखे वाटते.😔

 

नको असलेले काम

कोणीतरी बळजबरीने लाटते,

आयुष्यात काहीतरी

विसरल्या सारखे वाटते.😔

 

मायेच्या वेळी आपलेपणाचे

आभाळ फाटते,

आयुष्यात काहीतरी

विसरल्या सारखे वाटते.😔

 

आपुलकीच्या काळात

प्रेमाचे बंध निसटते,

आयुष्यात काहीतरी

विसरल्या सारखे वाटते.😔

– प्रेमा