☺️तुझ्या भेटीची ओढ☺️

मी कामात मग्न असलो तरी.
तुझे प्रेमळ डोळे मला खुणावतात..
आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…☺️

मी प्रवासात व्यस्त असलो तरी.
तुझी नखरेवाली चाल मला खुणावते..
आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…🤩

मी खेळात रममाण असलो तरी.
तुझा सोज्वळ चेहरा मला खुणावतो..
आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…☺️

मी विचारात गुंग असलो तरी.
तुझे मृदू बोल मला खुणावतात..
आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…🤩

मी चित्र रंगवत असलो तरी.
तुझे सुंदर केस मला खुणावतात..
आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…☺️

मी कुठेही फिरत असलो तरी.
तुझा कस्तुरी सुगंध मला खुणावतो..
आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…🤩

मी जेवण करत असलो तरी.
तुझे डाळींबी ओठ मला खुणावतात..
आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…☺️

मी पावसात भिजत असलो तरी.
तुझे बोलकं प्रेम मला खुणावते..
आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…🤩

मी सांजवेळी एकांतात असलो तरी.
तुझे गोबरे गाल मला खुणावतात..
आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…☺️

मी प्रेमाचे स्वप्न पाहत असलो तरी.
तुझा नाजूक स्पर्श मला खुणावतो..
आणि तुझ्या भेटीची ओढ लागते…🤩
– प्रेमा