काय ती चापलुसी करणं
काय ते पुढे पुढे करणं,
काय तो चेलेपणा करणं
सगळंच ओक्के हाय.😝
काय ते झाडावर चढवणं
काय ते बाजू घेणं,
काय ते पाठींबा देणं
सगळंच ओक्के हाय.😝
काय ते पदासाठी लाचार होणं
काय ते अपमानीत होणं,
काय ती खोटी प्रशंसा करणं
सगळंच ओक्के हाय.😝
काय ते श्रेष्ट्रीला गुंडाळणं
काय तो ससेमिरेपणा,
काय ते चमच्यांवर मेहेरबान होणं
सगळंच ओक्के हाय.😝
काय ते गप्प राहणं
काय ते मूग गिळणं,
काय ते पाया पडणं
सगळंच ओक्के हाय.😝
काय ते नाटकी वागणं
काय ते कागदी घोडे नाचवणं,
काय ते कुरघोड्या करणं
सगळंच ओक्के हाय.😝
काय ते स्वतःला सुरक्षित करणं
काय ते लाज काढून घेणं,
काय ते कामाच्या नावे बोंबलत फिरणं
सगळंच ओक्के हाय.😝
काय ती लोकांची बदनामी करणं
काय ते कष्टाळूंचे पाय खेचणं,
काय ते म्होरक्याचे जोडे उचलणं
सगळंच ओक्के हाय.😝
– प्रेमा
July 11, 2022 at 9:04 am
Ashe loka nehmich okkk madhye astat!!! Manachich laaj nasel ter kay karnar!
July 11, 2022 at 9:20 am
खरं आहे ताई.😀
धन्यवाद!🙏😊
July 11, 2022 at 9:38 am
Right
July 11, 2022 at 10:00 am
Thank you.🙏😊
July 11, 2022 at 10:19 am
Khoop chhaan 👍👍👍
July 11, 2022 at 12:14 pm
Thank you Dada.🙏😊