सोबत घालवलेला प्रत्येक
क्षण डोळ्या समोर तरळतो
येणारा पाऊस तुझी
आठवण करून जातो.❤️
उचंबळून येणाऱ्या हुंदक्याला
हळूवर समजवतो
येणारा पाऊस तुझी
आठवण करून जातो.❤️
मनातील अबोल प्रीतीने
कधी कधी जीव गुदमरतो
येणारा पाऊस तुझी
आठवण करून जातो.❤️
आकस्मित घडलेल्या
घटनांवर राग कोसळतो
येणारा पाऊस तुझी
आठवण करून जातो.❤️
तुझ्या स्मरणाचा पाऊस
मनात तुफान बरसतो
येणारा पाऊस तुझी
आठवण करून जातो.❤️
विजेच्या कडाडणाऱ्या
आवाजात असा बहरतो
येणारा पाऊस तुझी
आठवण करून जातो.❤️
प्रेमाचा सुगंध अजूनही
तितकाच दरवळतो
येणारा पाऊस तुझी
आठवण करून जातो.❤️
प्रेमाच्या आठवणीत
मी स्वतःलाच सावरतो
येणारा पाऊस तुझी
आठवण करून जातो.❤️
– प्रेमा
July 22, 2022 at 6:37 am
Very nice!!
July 22, 2022 at 7:31 am
Thank you.❤️
July 22, 2022 at 9:00 am
खूप छान 👍👍👍
July 22, 2022 at 10:00 am
धन्यवाद.🙏😊