सकाळचे पाच वाजले की ही सुरू होई,
ते रात्री अकरा पर्यंत अविरत चालू राही,
याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃
ओळख जीची गोरगरिबांची सोबती,
वाहक-चालक सर्व प्रवाशांशी समानतेने वागती,
याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃
लहान थोरांच्या कलकलाटाने धन्य होई,
कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना वाहून नेई,
याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃
सगळ्यांच्या गंमतीजमती ही जवळून पाही,
हिचे प्रवाशांशी अतूट नाते तयार होई,
याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃
पुण्याच्या कोणत्याही दिशेला ही न थकता जाई,
पीएमपीएमएलच्या प्रवासाने पुणेकर धन्य होई,
याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃
पुण्याच्या विकासात नक्कीच ही वाटेकरी,
वाहक-चालक दिसती माणुसकीचे पहारेकरी,
याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃
– प्रेमा
Leave a Reply