समोर अथांग हा समुद्रकिनारा
अंगाला झोंबतो हा गार गार वारा.🤩
सहन न होई दुःखी अनुभवांचा पहारा
या अबोल मना तुझ्या स्पर्शाचा सहारा.🤩
गुपित दडल्या प्रेमाच्या ह्या असंख्य लहरा
तुझ्या नाजूक बोलाने जीवन आले बहरा.🤩
मायेची पोकळी शोधू पाहे शांत निवारा
तुझ्या डोळ्यात मिळे प्रेमाचा किनारा.🤩
तुझं प्रेम बावन्न खणी सोन्याचा पिंजरा
ये अशी मिठीत प्रेमाचा दिवस करू साजरा.🤩
– प्रेमा.
July 26, 2022 at 8:05 am
सुंदरच प्रेमाचा महोत्सव करा साजरा
July 26, 2022 at 1:12 pm
धन्यवाद.🙏😊
July 26, 2022 at 10:14 am
Very much romantic
July 26, 2022 at 1:12 pm
Thank you.🙏😊
July 26, 2022 at 1:05 pm
खूपच छान 👍👍👍
July 26, 2022 at 1:12 pm
धन्यवाद.🙏😊