माहित नाही कसे

पण जीवनातील सर्व

दुःख विसरवते तुझी मिठी.👩‍❤️‍👨

 

जवळ येताच

प्रेमाची जाणीव

करून देते तुझी मिठी.👩‍❤️‍👨

 

अचानक येणाऱ्या

संकटाशी लढण्याचे

बळ देते तुझी मिठी.👩‍❤️‍👨

 

संसाराच्या मायाजालात

स्वतःला विसरण्यास

भाग पाडते तुझी मिठी.👩‍❤️‍👨

 

स्वार्थी लोकांच्या

या गराड्यात पण

सुरक्षित वाटते तुझी मिठी.👩‍❤️‍👨

 

क्षणात आयुष्यातील

ताण थोडा तरी

पळवून लावते तुझी मिठी.👩‍❤️‍👨

– प्रेमा