आला पावसाळा आणि

दिवस पण फिरण्याचे,

निसर्गाच्या सानिध्यात

राहून आनंद घेण्याचे.🥰

 

आला पावसाळा आणि

दिवस पण फिरण्याचे,

दुःख थोडं बाजूला सारून

आपले आपणच खुश होण्याचे.🥰

 

आला पावसाळा आणि

दिवस पण फिरण्याचे,

कोणीतरी आठवून ओठांवर

नकळत हसू येण्याचे.🥰

 

आला पावसाळा आणि

दिवस पण फिरण्याचे,

काही वेळ स्वतःला विसरून

निसर्गात दंग होण्याचे.🥰

 

आला पावसाळा आणि

दिवस पण फिरण्याचे,

कोणाच्या तरी आठवणीत रमून

स्वतःचे भान हरवण्याचे.🥰

 

आला पावसाळा आणि

दिवस पण फिरण्याचे,

हिरवा निसर्ग पाहून

खुशीने कृत कृत होण्याचे.🥰

 

आला पावसाळा आणि

दिवस पण फिरण्याचे,

रंगीबेरंगी निसर्ग डोळ्यात साठवून

आपले मन प्रसन्न करण्याचे.🥰

 

आला पावसाळा आणि

दिवस पण फिरण्याचे,

ओठातून अलगद प्रेमाचे

आवडते गीत गाण्याचे.🥰

– प्रेमा