तूझी वाट पाहून मी दमले आहे
तुझ्या येण्याची चाहूल लागण्याची
आशा मी सोडली आहे.😊

तूझी वाट पाहून मी दमले आहे
तुझ्या येण्यासाठीचे प्रयत्न
करणे मी थांबवले आहे.😊

तूझी वाट पाहून मी दमले आहे
तुझा विचारांना मी स्वतःपासून
खूप खूप दूर सारलं आहे.😊

तूझी वाट पाहून मी दमले आहे
तुझ्यासाठी पाहिलेली स्वप्न मी
माझ्यापासून दूर लोटली आहे.😊

तूझी वाट पाहून मी दमले आहे
तुझे माझ्या नात्यातील प्रेम मी
राम भरवसे ठेवले आहे.😊

तूझी वाट पाहून मी दमले आहे
तुझ्या नशिबात प्रेमाचा सहवास
नसावा हे मी मानले आहे.😊
– प्रेमा