रक्तात भिनावीस अशी

तू माझ्या नसात आहेस.☺️

 

जीवनात राहावीस अशी

तू माझ्या श्वासात आहेस.☺️

 

कायम ठेवावीस अशी

तू माझ्या मनात आहेस.☺️

 

सोबत असावीस अशी

तू माझ्या विचारात आहेस.☺️

 

नेहमी भासावीस अशी

तू माझ्या सहवासात आहेस.☺️

 

जिवापाड जपावीस अशी

तू या तुझ्या प्रेमात आहेस.☺️

– प्रेमा.