हस्त नक्षत्राचा तुझा जन्म पै कुटुंबाला सुखावून गेला,
तुझ्या येण्याने या घरात आनंदाचा भरणा आला.☺️

घरात सगळीकडे तुझा चिवचिवाट फार असतो,
काम सोडून आम्ही तुझं बोलणं ऐकत बसतो.😀

व्यावसायिक जीवनात तू कामातला एक नंबर किडा,
कामाच्या नादात खाणं पिणं विसरते मग कोणी कितीही ओरडा.😂

ऑफिस मध्ये तुला बोलताना लोकं दहा वेळा विचार करतात,
तुझे पुणेरी बोलणं ऐकण्या पेक्षा काम केलेलं बरं म्हणतात.😛

घरच्यांवर पैसे उडवताना मागे पुढे पाहत नाहीस,
शॉपिंग करताना कोणाचे काहीच ऐकत नाहीस.😊

जीवनात कायम असचं रहा आनंदी आणि छान,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला लाभो सुख समाधान.🥰

पुर्ण होवो तुझ्या मनीच्या सर्व इच्छा,
प्रिय जयू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁💐
– प्रेमा