तुझे ते नशीले डोळे
परत माझ्या समोर आले,
आपल्या त्या भेटीची रम्य
आठवण देऊन गेले.☺️
तुझे ते लुसलुशीत ओठ
परत माझ्या समोर आले,
आपल्या त्या नाजूक क्षणांची
आठवण देऊन गेले.☺️
तुझे ते निरागस हास्य
परत माझ्या समोर आले,
आपल्या त्या प्रेमळ गप्पांची
आठवण देऊन गेले.☺️
तुझे ते लोभस केस
परत माझ्या समोर आले,
आपल्या त्या मखमली स्पर्शाची
आठवण देऊन गेले.☺️
तुझे ते कोकीळ बोल
परत माझ्या समोर आले,
आपल्या त्या वचनांची
आठवण देऊन गेले.☺️
तुझे ते नखरेल चालणे
परत माझ्या समोर आले,
आपल्या त्या पहिल्या प्रेमाची
आठवण देऊन गेले.☺️
– प्रेमा
August 22, 2022 at 2:27 pm
Chan, chan ani chan!
September 6, 2022 at 8:50 am
धन्यवाद ताई.🙏🥰