आला आला पाऊस

पुर्ण करुन घे तुझी

पावसात भिजण्याची हौस.🥰

 

आला आला पाऊस

माझी सोबत करताना

उगाच भाव नको खाऊस.🥰

 

आला आला पाऊस

मला सोडून एकटाच

फिरण्यास नको जाऊस.🥰

 

आला आला पाऊस

पावसात आनंद लुटताना

जगाकडे नको पाहुस.🥰

 

आला आला पाऊस

मी तुझ्याकडे पाहताना

शरमेने लाल नको होऊस.🥰

 

आला आला पाऊस

प्रेमाच्या आठवणीत

स्वतःला वाहून नको घेऊस.🥰

– प्रेमा