तुझा संयमी स्वभावच तुला आयुष्यात पुढे नेणार,
धडपडणारा तू एक दिवस चांगला उद्योजक होणार.😊
तुझ्या सोबतीत मैत्रीच्या अनेक छटा अनुभवतो,
तुझ्यातीली माणुसकीचा गुण क्षणोक्षणी जाणवतो.😊
असाच सरळ, सच्चा माणूस म्हणून जगत रहा,
उद्याचा तू कर्तुत्वाने मोठा होताना स्वतःला पहा.😊
लोकांना मदत करण्याची तुझी वृत्ती अशीच असु दे,
सर्व सुख आणि आनंद तुझ्या जीवनी कायम वसू दे.😊
तूझ्या माझ्या गप्पांत जेंडर कधी आडवा येत नाही,
कोणत्याही विषयावर बोलताना संकोच वाटत नाही.😊
पूर्ण होवो तुझ्या मनीच्या सर्व अशा व इच्छा,
प्रिय भरत तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍫💐
– प्रेमा
Leave a Reply