आला आला सण गोपाळ काला,
बाळ गोपाळ जमले या सोहळा.🥰
सर्व गोविंदा पथक पहा किती उत्साही,
दहीहंडी फोडण्याची झाली आता घाई.🥰
ढोल ताशे, डिजेचा आवाज येता थिरकते ही तरुणाई,
प्रत्येक कणा कणात आनंदाचा संचार होई.🥰
इथले रस्ते सारे लोकांच्या गर्दीने ओसंडून जाती,
दहीहंडीचा सोहळा सर्वजण डोळे भरून पाहती.🥰
बक्षीस मिळवण्यासाठी दहीहंडी पथकांची गर्दी झाली,
उंच मानवी मनोरे पाहण्यासाठी पुणे नगरी उत्साहात न्हाली.🥰
गोकुळाष्टमी सणाची वर्षभर वाट पाहते ही तरुणाई,
बाळगोपाळांची ही दहीहंडी उत्साहात साजरी होई.🥰
– प्रेमा
Leave a Reply