एखाद्याच्या आठवणीत झुरण्यात प्रेम असतं

की, त्या आठवणीतून चांगले ध्येय ठरवण्यात प्रेम असतं?🤔

एखाद्यावर प्रेम केलं तर त्याला मिळवण्यात प्रेम असतं

की, सत्य स्वीकारून आयुष्याची नवी सुरुवात करण्यात प्रेम असतं?🤔

आपण प्रेम करणारी व्यक्ती सोडून गेली म्हणून आयुष्य संपवण्यात प्रेम असतं

की, जन्मदात्या आईवडीलांचा विचार करून काहीतरी भन्नाट करून दाखवण्यात प्रेम असतं?🤔

एखादी व्यक्ती आपल्या पासून दूर गेली म्हणून दिवस रात्र रडण्यात प्रेम असतं

की, जिद्दीने पेटून स्वतःच आयुष्य घडवण्यात प्रेम असतं?🤔

माझ्या बाबतीत वाईटच घडतं यावर रात्र जगवण्यात प्रेम असतं

की, समोर आलेल्या परिस्थितीला दोन हात करण्यात प्रेम असतं?🤔

कधी न मिळणाऱ्या मृगजळामागे धावण्यात प्रेम असतं

की, स्वतःच अस्तित्व राखून काहीतरी चांगलं करून दाखवण्यात प्रेम असतं?🤔

कधी न मिळणाऱ्या व्यक्तीच्या स्वप्नात रंगण्यात प्रेम असतं

की, सत्य स्वीकारून पुढे जाण्याचा मार्ग काढण्यात प्रेम असतं?🤔

– प्रेमा