अजुन तर निवडणूक येणे आपल्यापासून कोसो खूप दूर आहे,

त्याआधी कार्यकर्त्यामध्ये लोकांना धमकवण्याचा भरला फुकटचा जोर आहे.😒

 

राजकारण विसरून समाजकारणात केलेल्या कामाचा पडला विसर आहे,

उपद्व्याप करणाऱ्या लोकांना हाताशी घेऊन राजकारणाचा मांडला बाजार आहे.😒

 

समाजकारणात राजकारण आणू नये हा थोरामोठ्यांचे बोल आहे,

वर वर माणुसकी दाखवणारे कोल्हे झालेत बघा उघडा पडला यांचा झोल आहे.😒

 

तुमच्या धमक्या आणि दमदाटीला न घाबरणारा इथे एक स्त्री वर्ग आहे,

दिड दमडी लोकांना पुढे करून सुतावरून गाठत आहात हा स्वर्ग आहे.😒

 

निवडणुकी आधी माज दाखवतात काही नेते यात कोणता मोठा गर्व आहे,

एक दिवस तुम्हाला पण जागा दाखवेल मतदार राजा त्याच्या हातीच तर सर्व आहे.😒

 

उगाच नका दाखवू स्थानिक लोकांना सत्तेचा फुकटचा माज आहे,

तुमच्या या कर्तुत्वावर जनता कधी तरी घालणार तुम्हाला चपलांचा साज आहे.😒

– प्रेमा