लोकं झाली हैराण कोरोनाच्या बातम्यात,

विशाखा पडली गोल गोल गारींच्या प्रेमात.😀

 

विशाखा दिसते छान, हसते पण छान,

आज झाली गारीचे गुणगान गाण्यात बेभान.😀

 

विशाखा सदस्यांचे नाव बदलते म्हणून कितीही करा घाई,

रूजुता नंतर विशाखा झाली पॉडकास्टची आत्याबाई.😀

 

पॉडकास्टचं एक गुपित हळूवार मनाशी समेट,

सगळ्या सदस्यांची लाडकी होशील घेशील जेंव्हा सर्व कमेंट.😀

 

खटावकरचे खाटावकर तर प्रेमलाचे प्रेमलता होते,

अशी किमया पॉडकास्ट मध्ये रुजूता नंतर विशाखा करते.😀

 

हसत खेळत पॉडकास्ट करताना वाटते ही बबली,

आज गारांच्या नवीन गोष्टीत विशाखा लईच गुंगली.😀

– प्रेमा