मातीतला माणूस मातीत राहून कर्माने नाव गाजवतोय,

गावाकडच्या गोष्टीतून ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती दाखवतोय.😊

 

गोर गरीब लोकांचे कष्ट समाजाला दाखवून विचार करण्यास भाग पडतोय,

खेड्या पाड्यातील कौशल्य मिडिया समोर हिरीरीने मांडतोय.😊

 

प्रोत्साहनासाठी फक्त चांगल्याच गोष्टी नाही तर लोकांचे काबाडकष्ट समाजाला समजावतोय,

घेतला वसा टाकणार नाही या विचाराने गावाकडे अधिक अधिक धाव घेतोय.😊

 

अशा अनोख्या कामाने फक्त पुरस्कारच नाही तर सर्वांचे प्रेम मिळवतोय,

मोठ्या ठिकाणी काम करताना पण मातीशी नाळ जुळवून माणुसकी कळवतोय.😊

 

गावातील तरुणवर्गाचे छोट्या छोट्या कामातील नावीन्य जगा समोर आणतोय,

सर्वांसोबत प्रेमाने व आपुलकीने वागून भला माणूस म्हणवतोय.😊

 

एवढा मोठा माणूस होऊनही स्वतःला लहानच समजतोय,

स्वतःतील चांगुलपणामुळे पॉडकास्टचा श्रीकांत प्रेमाच्या कवितेत उतरतोय.😊

– प्रेमा